🔴 खारघर येथे पार पडलेल्या डेव्हिल्स सर्किट २०२५ ला मेडिकव्हर हॉस्पिटल्सकडून चोवीस तास वैद्यकिय मदत.
यूथ महाराष्ट्र. नवी मुंबई / प्रतिनिधी : दिनांक : ३ डिसेंबर २०२५. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आव्हानात्मक अशा शर्यत स्पर्धांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट २०२५ साठी मेडिकव्हर हॉस्पिटल्सने वैद्यकिय मदतीकरिता हात पुढे सरसावला. खारघर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ४,५६७ धावपटू आणि १,६७८ प्रेक्षक सहभागी झाले होते. वैद्यकीय सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, मेडिकव्हर हॉस्पिटल्सने याठिकाणी पूर्णपणे सुसज्ज अशी वैद्यकीय सेवा पुरविली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान डॉक्टर, परिचारिका, २ रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवेसंबंधीत टीम याठिकाणी हजर होती आणि गरज पडल्यास त्वरित वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या. या टीमने ६००+ हून अधिक रुग्णांशी संवाद साधला, ज्यामध्ये किरकोळ दुखापतींवर प्रथमोपचार, हायड्रेशन सपोर्ट, स्नायूंसंबंधी दुखापतींचे व्यवस्थापन, थकवा आणि इतर आवश्यक वैद्यकीय मदतीचा समावेश होता. डेव्हिल्स सर्किट ही भारतातील पहिली आणि सर्वात प्रतिष्ठित धावण्याची शर्यत आहे, जी तिच्या आव्हानात्मक लष्करी शैलीतील अडथळ्यांसाठी ओळखली ज...